मंगलमय नाम तुझे, सतत गाऊ दे॥धू॥।

दुर्बल या हृदयातुनि, चंचल या चित्तातुनि। झुरझुरत्या नेत्रातुनि, स्वरुप पाहु दे।।१॥

अंधाऱ्या, निर्जन वनि, विषयांच्या काट्यांतुनि। चौऱ्यांशी गोट्यातुनि, पार जाउ दे ।।२॥

संतांची बोध-धुळी, लागो या देह-कुळी। भक्तीच्या प्रेम-जळी, मस्त होउ दे। मंगल ०।।३॥।

मन्मानस-मंदिरात, सिंहासन तव प्रशांत सोSहं ध्वनि गात गात, रंगि रंगु दे ।।४॥

भवसागर कठिण घोर, षडरीपु हे करिति जोर। तुकड्याची नाव पार, स्थीर होउ दे ।।५।।